गुरुवार, २५ जून, २०१५

गुगल आमचा सोबती!

प्रेग्नंसी कन्फर्म झाल्यानंतर डॉक्टरकडे दर दोन महिन्याला चेक अप साठी जाणं होऊ लागलं. पण बर्याच गोष्टी जसं, सारखं पोटात दुखणं, उलटी होणं, पायांची सूज का उतरत नाही वगैरे नेमके कशामुळे होतात, हे मला आणि आसिफला कळायचं नाही. डॉक्टरांना विचारल्यानंतरही त्यांची टिपिकल उत्तरं मिळायची, असं होतंच. वर डॉक्टरचा किंवा नर्सचा प्रश्न असायचाच, पहिलंच बाळंतपण का गं? हो, म्हटल्यावर त्यांच्या चेहर्यावर चटकन मिश्किल हसूही तयार. आई पण तेच सांगायची. पण का होतं, याला उत्तर नाही.
पहिल्या तीन महिन्यातलं बाळ म्हणजे डॉक्टरच्या म्हणण्यानुसार गर्भ. मग हा गर्भ असतो कसा, त्याची वाढ कशी होते. हे सगळं एेकून माहित होतं. पण असंच का, कसं, कधी, केव्हा याला उत्तर नव्हती. शेजार-पाजारचे, घरचे सांगणार तसं एेकायचं आणि स्वतःची आणि बाळाची काळजी घ्यायची, हे आम्हाला पटणारं नव्हतं.
मित्र-मैत्रिणींनी देखील गरोदरपणावरची पुस्तकं भेट दिली होती. ती वाचूनही आमचं समाधान व्हायचं नाही. शिवाय मोबाईलवर प्रेग्नंसी अॅपही डाऊनलोड केलेलं होतं. त्यामुळे आमच्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी वा वाचलेलं पडताळून पाहण्यासाठी आम्हाला गुगलच आमचा सोबती वाटू लागला.  त्या काळात आम्ही इतकं गुगलमय झालो होतो की जरा कुठे खट्ट झालं की आम्ही 'गुगल' करायचो.
सुरूवातीला जरा जास्तच पोटात दुखू लागलं किंवा आणखी कसला किरकोळ त्रास होऊ लागला तरी आम्ही डॉक्टरकडे पळायचो. पुढे तर गुगलवरचा विश्वास इतका वाढला की, बाळाच्या हालचाली कमी जाणवताहेत, कर गुगल. बाळ आपल्या बोलण्याला रिस्पॉन्स देत नाहीय, कर गुगल. मला रविवारी रात्री 12 च्या दरम्यान ब्लीडिंग सुरू झालं तेव्हाही आम्ही पहिल्यांदा गुगलवलर सर्च केलं. आमचं पिल्लू आमच्यासोबत येण्यास अजून आठ-बारा तासांचा अवधी  आहे, असं  कळल्यावर आम्ही दोघंही बिनधास्त झोपून गेलो आणि सकाळी अकराच्या सुमारास डॉक्टराकडे गेलो. (हे जेव्हा मी माझ्या घरच्यांना आणि राणे काकींना सांगितलं तेव्हा मात्र त्यांच्याकडून मला भरपूर ओरडा मिळाला.)
काहीही असो, गुगलवर उगाच  हे कर ते करू नको, अशा दमदाटी वजा सूचना नव्हत्या. तिथे फक्त आमच्या प्रश्नांनाच उत्तर मिळायची नाहीत, तर एखादी ममा, मॉमही भेटायची जी तिचे अनुभव शेअर करायची. नवनवीन टीप्स द्यायची.  एकूणच त्या काळात  गुगलने आम्हाला अगदी मस्त साथ दिली होती.


मंगळवार, १६ जून, २०१५

लिहित रहायचंय...

सगळ्याच गोष्टी मिस करतेय...😢 माझ बीट, रिपोर्टिंग, बातम्या, बाय लाइन... या क्षणी तर सगळ शून्यच वटतेय. स्वप्नात फक्त बातमी मागे धावनारि मी दिसते नि झोप उड़ते. मग डोळ्यासमोरुन पत्रकारितेतले सुरुवतीचे दिवस, बतमीसाठीची धडपड सारे झरझर सरकत राहत. मी डोळे बंद करून गुपचुप पडून राहते. जुन्या आठवणींमधे रमतं.

अल्विराच्या जन्मानंतर तर बरेच दिवस तिला पाठीशी बांधून (झाशीच्या राणी सारख) रिपोर्टिंगला जातेय अस, स्वप्न पडायच. स्वप्नच ते. बर्याचदा पर्यावरण, शिक्षण बीटवरच्या किंवा एखादी ह्युमन इंटरेस्टची स्टोरी पाहिली की ती वाचताना मी स्टोरी अशी लिहिली असती. यामध्ये आणखी काय add करता आलं असतं, एक ना अनेक गोष्टी मनातल्या मनात रचल्या जातात.

कधी कधी खुप घुसमट होते माझी. चिडचिड होते. दिवसभरात मी काय करते? त्याचा लेखाजोखा मनातच मांडला जातो. किचन आणि अल्विरा याच्या पलिकडे माझं अस्तित्त्वच मला जाणवत नाही. खूप काही लिहावंस वाटत असतं. बोलावंस वाटत असतं. पण व्यक्त व्हायला शब्द अपुरे पडतात किंवा मग फक्त स्वतःवरचा रागच धुसमुसत बाहेर पडतो.

पर्याय एकच उरतो, लिहिण्याची जी काही  खाज आहे ती अशी  भागवायची. thanks to Dinkar Gangal Sir
Meghana Dhoke madam, Aparna Velankar madam यांच्यामुळे मला पुन्हा लिहायला, व्यक्त व्हायला मिळतेय. वाइट एकाच गोष्टीच वाटतेय डेड़ लाइन पाळता येत नाही. कारण अल्विराच्या ड्यूटीतुन सुटका झाल्यानंतरच इतर डयूटया! ती दुपारची झोपणार तेव्हाच नाही तर मग थेट रात्रीच पीसीसमोर बसता येणार. पण तेव्हाही लिहिण्याचा मूड असेलच असं नाही. थकल्यामुळे अनेकदा काही सुचतच नाही. मग अशावेळी बर्याचदा तिच्या बाजूला पडून किंवा तिच्याबरोबर खेळता खेळताच मनातलं मोबाईलवर (गुगल कीपवर) उतरवलं जातं.

मला लिहायला आवडतं. खूप आवडतं. त्यामुळे सध्या तरी फक्त लिहित रहायचंय. त्यातूनच समाधान मिळवायचंय.


(ह्या कंपन्या आपल्या एम्प्लॉईज़च्या मुलांसाठी पालनाघर का सुरु करत नाहीत? माझ्या सारख्या आयांसाठी सोयीच ठरेल 
😌)

गुरुवार, ११ जून, २०१५

सायकल

अल्वीरला सायकल तशी लवकरच मिळाली. तिच्या दुसऱ्या वाढदिवसच गिफ्ट. तिच्या अब्बुने तिला परवाच घेवून दिली. 
आमच्या वाढदिवसाला आई पपांनी आणलेल्या ड्रेस व्यतरिक्त मित्रमैत्रीणिनि आणलेला पारले जी बिस्किटचा पुडा, कंपास बॉक्स, पेन्सिल असच काहीतरी मिळयच. (आता गिफ्ट्स मधेहि भरपूर व्हरायटी आलिय.)
तिची सायकल घरी आली नि मला आमच्या सायकलीची आठवण आली. मला आणि माझ्या बहिणीना (Aarti Rane Asha Mestry) सायकलीची तशी गरज वाटली नाही. कारण शाळा दोन मिनिटांच्या अंतरावर. 
भावाने (Ashish Rane) मात्र सातवीत गेल्यावर वडिलांजवळ सयकलचि मागणी केलि. त्याची शाळा लांब होती आणि त्याच्या मित्रांकडे सायकल होती. त्याची काशिबशि समजुत काढत, सायकल घेणे लंबनिवर टाकल जात होत. (विशेष म्हणजे, त्याच दरम्यान गावच्या चुलत भावानेही पपांकड़े सायकल मागितली होती. पपांनी त्याला मात्र लगेचच सायकल घेवून दिली होती. तिहि नवी. )
अखेर वर्षभराने सेकण्ड हैंड सयकल घरी आली. तीहि भंगरवाले त्यांचा माल नेण्यासाठी वापरतात तशी अगदी जुन्या स्टाइलची. घोडा टाइप. 500-700 रुपयांची. (पपा ती सयकलहि साखलीने खिड़किला बांधून ठेवायचे. आम्हाला प्रश्न पड़ायचा, ही एवढी जड़ सायकल कोण चोरून नेणार.) त्याच्या मित्रांच्या सायकली मात्र मस्त. पण त्याने कधी कुरबुर केलि नाही की नवी सायकल मगितलिहि नाही. दहावी पर्यंत त्याने ती सायकल आवडीने वापरली. पुढे त्या सायकलिचा वापर होत नसल्याने पपानी ती कोणाला तरी देवून टाकली.
आता हा सेकंड हैण्डचा जमाना तर गेलाच पण एकच वस्तु वर्षानुवर्षे टिकवुन वापरण्यातली गंमतही गेली.

शनिवार, १६ मे, २०१५

ब्लॉग प्रपंच कशासाठी

लग्न झाल्यानंतर साधारण चार-पाच महिन्यांच्या आतच मला दिवस गेले. त्याबद्दल जसंजसं जवळपासच्या लांबच्या लोकांना कळू लागलं तशी प्रश्नांची सरबत्ती, अनाहूत सल्ले सुरू झाले. आमचं आंतरधर्मीय लग्न असल्याने तसं होणारचं होतं, असं असिफचं म्हणणं. बरं सल्ले तरी कसे... घाई केलात नाही. अजूनही वेळ आहे... ऍबॉर्शन करू शकतेस. लग्न टिकणारेय का तुमचं? मुस्लिम मुलाबरोबर लग्न केलंएस, बघ बाबा... जमतंय का... नाहीतर वर्ष सहा महिन्यांतच माहेरचा रस्ता धरशील. माहेरचे ताठ आहेत न ग तुझे.  बरं मग तुझ्या मुलाचा/मुलीचा धर्म कोणता?

प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न... या प्रश्नांमधून डोकं वर काढून आम्हाला (आसिफला आणि मला) पहिले काही महिने आमच्या बाळाच्या येण्याचं कोडकौतुक असं काही करताचं आलं नाही. खरं तर आमचं लग्न आणि पुढच्या सार्या गोष्टी अगदी आमच्या मुलांपर्यंतच्या आम्ही ठरवून टाकल्या होत्या. काही गोष्टींसाठी पर्याय शोधले होते. पण तरीही या प्रश्नामुळे मी पॅनिक व्हायचे. अासिफ शांतच असायचा. त्याचं एकच उत्तर असायचं, आपण पूर्वीचं ठरवलंय  सगळं. त्यात बदल होणार नाहीत.  माझं समाधान व्हायचं नाही. त्यामुळे सुरूवातीचा काळ अासिफशी वाद घालण्यातच जास्त गेला. 

या गोंधळामध्ये मी आणि माझं बाळ एकत्र असूनही एकत्र नव्हतो... ते येत असल्याची प्रत्येक चाहूल तो अनुभव पुन्हा एकदा  जगता यावा, ते निसटलेले क्षण पुन्हा अनुभवता यावे, शिवाय आम्हाला आलेले अनुभव आमच्यासारख्याच इतर  आई - बाबांबरोबर शेअर करता यावा यासाठीच ब्लॉगचा खटाटोप.