सगळ्याच गोष्टी मिस करतेय...😢 माझ बीट, रिपोर्टिंग, बातम्या, बाय लाइन... या क्षणी तर सगळ शून्यच वटतेय. स्वप्नात फक्त बातमी मागे धावनारि मी दिसते नि झोप उड़ते. मग डोळ्यासमोरुन पत्रकारितेतले सुरुवतीचे दिवस, बतमीसाठीची धडपड सारे झरझर सरकत राहत. मी डोळे बंद करून गुपचुप पडून राहते. जुन्या आठवणींमधे रमतं.
अल्विराच्या जन्मानंतर तर बरेच दिवस तिला पाठीशी बांधून (झाशीच्या राणी सारख) रिपोर्टिंगला जातेय अस, स्वप्न पडायच. स्वप्नच ते. बर्याचदा पर्यावरण, शिक्षण बीटवरच्या किंवा एखादी ह्युमन इंटरेस्टची स्टोरी पाहिली की ती वाचताना मी स्टोरी अशी लिहिली असती. यामध्ये आणखी काय add करता आलं असतं, एक ना अनेक गोष्टी मनातल्या मनात रचल्या जातात.
कधी कधी खुप घुसमट होते माझी. चिडचिड होते. दिवसभरात मी काय करते? त्याचा लेखाजोखा मनातच मांडला जातो. किचन आणि अल्विरा याच्या पलिकडे माझं अस्तित्त्वच मला जाणवत नाही. खूप काही लिहावंस वाटत असतं. बोलावंस वाटत असतं. पण व्यक्त व्हायला शब्द अपुरे पडतात किंवा मग फक्त स्वतःवरचा रागच धुसमुसत बाहेर पडतो.
पर्याय एकच उरतो, लिहिण्याची जी काही खाज आहे ती अशी भागवायची. thanks to Dinkar Gangal Sir
Meghana Dhoke madam, Aparna Velankar madam यांच्यामुळे मला पुन्हा लिहायला, व्यक्त व्हायला मिळतेय. वाइट एकाच गोष्टीच वाटतेय डेड़ लाइन पाळता येत नाही. कारण अल्विराच्या ड्यूटीतुन सुटका झाल्यानंतरच इतर डयूटया! ती दुपारची झोपणार तेव्हाच नाही तर मग थेट रात्रीच पीसीसमोर बसता येणार. पण तेव्हाही लिहिण्याचा मूड असेलच असं नाही. थकल्यामुळे अनेकदा काही सुचतच नाही. मग अशावेळी बर्याचदा तिच्या बाजूला पडून किंवा तिच्याबरोबर खेळता खेळताच मनातलं मोबाईलवर (गुगल कीपवर) उतरवलं जातं.
मला लिहायला आवडतं. खूप आवडतं. त्यामुळे सध्या तरी फक्त लिहित रहायचंय. त्यातूनच समाधान मिळवायचंय.
(ह्या कंपन्या आपल्या एम्प्लॉईज़च्या मुलांसाठी पालनाघर का सुरु करत नाहीत? माझ्या सारख्या आयांसाठी सोयीच ठरेल

😌)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा