गुरुवार, ११ जून, २०१५

सायकल

अल्वीरला सायकल तशी लवकरच मिळाली. तिच्या दुसऱ्या वाढदिवसच गिफ्ट. तिच्या अब्बुने तिला परवाच घेवून दिली. 
आमच्या वाढदिवसाला आई पपांनी आणलेल्या ड्रेस व्यतरिक्त मित्रमैत्रीणिनि आणलेला पारले जी बिस्किटचा पुडा, कंपास बॉक्स, पेन्सिल असच काहीतरी मिळयच. (आता गिफ्ट्स मधेहि भरपूर व्हरायटी आलिय.)
तिची सायकल घरी आली नि मला आमच्या सायकलीची आठवण आली. मला आणि माझ्या बहिणीना (Aarti Rane Asha Mestry) सायकलीची तशी गरज वाटली नाही. कारण शाळा दोन मिनिटांच्या अंतरावर. 
भावाने (Ashish Rane) मात्र सातवीत गेल्यावर वडिलांजवळ सयकलचि मागणी केलि. त्याची शाळा लांब होती आणि त्याच्या मित्रांकडे सायकल होती. त्याची काशिबशि समजुत काढत, सायकल घेणे लंबनिवर टाकल जात होत. (विशेष म्हणजे, त्याच दरम्यान गावच्या चुलत भावानेही पपांकड़े सायकल मागितली होती. पपांनी त्याला मात्र लगेचच सायकल घेवून दिली होती. तिहि नवी. )
अखेर वर्षभराने सेकण्ड हैंड सयकल घरी आली. तीहि भंगरवाले त्यांचा माल नेण्यासाठी वापरतात तशी अगदी जुन्या स्टाइलची. घोडा टाइप. 500-700 रुपयांची. (पपा ती सयकलहि साखलीने खिड़किला बांधून ठेवायचे. आम्हाला प्रश्न पड़ायचा, ही एवढी जड़ सायकल कोण चोरून नेणार.) त्याच्या मित्रांच्या सायकली मात्र मस्त. पण त्याने कधी कुरबुर केलि नाही की नवी सायकल मगितलिहि नाही. दहावी पर्यंत त्याने ती सायकल आवडीने वापरली. पुढे त्या सायकलिचा वापर होत नसल्याने पपानी ती कोणाला तरी देवून टाकली.
आता हा सेकंड हैण्डचा जमाना तर गेलाच पण एकच वस्तु वर्षानुवर्षे टिकवुन वापरण्यातली गंमतही गेली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा